टाकळी भीमा येथे शेतकऱ्यांसाठी शेतीशाळा .
Lokmat

या लेखाविषयी

आत्मा' अंतर्गत दौंड तालुक्यातील टाकळी भीमा मारुती मंदिर येथे ऊस पिकाच्या शेतीशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या शेतीशाळेत पाटस येथील श्री .संदीप घोले यांनी शेतकऱ्यांना ऊस पीक विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये उसाची लागवड पद्धत, बेणे निवड, बेणेप्रक्रिया, पाणी व खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचे ऊस पिकातील कार्य, हुमणी व खोडकीडा या कीडरोग व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.

मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.