
या लेखाविषयी
पाटस येथील संदीप घुले या पदवीधर युवकाने नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेती व्यवसायालाच नोकरी समजून अगदी कमी वयात तालुक्यात एक प्रगतिशील शेतकरी म्हणून नावलौकिक मिळविला आहे. कृषी विद्यापीठातील कृषी अधिकारी व तज्ज्ञांनीही त्याचे कौतुक केले आहे. अनेक सामाजिक संघटनांनी त्याचा कृषिरत्न पुरस्कार देऊन गौरव केला आहे. अवघ्या एक एकरात आधुनिक पद्धतीचा वापर केल्याने तयार झालेले दर्जेदार उसाचे पीक दाखविताना संदीप घोले .
मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.