
या लेखाविषयी
पाटस (ता. दौंड) येथील शेतकरी संदीप घोले यांनी देखील आपल्या शेतामध्ये अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करीत तुरीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. यासाठी घोले यांनी निर्मल दुर्गा तूर या नवीन व्हरायटीची आधुनिक पद्धतीने चार बाय दीड अशी लागवड करून कमी खर्चात व कमी पाण्यात तुषार सिंचनाचा वापर केला आहे. तुषार सिंचन पद्धतीने पिकाला पाणी दिल्याने कमी पाण्यात जास्तीचे उत्पादन मिळाले आहे.
मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.