
या लेखाविषयी
पाटस : येथील संदीप घोले यांनी आधुनिक पध्दतीने कोरडीला कांदा लागवड केली आहे. थंडीचा जोर वाढल्यामुळे कांदा पिकाला अत्यंत पोषक थंड हवामानाचे वातावरण तयार झाल्यामुळे संदीप घोले यांनी कोरडीला कांदा लागवड केली आहे. कोरडीलाच वाफे पद्धतीने दोन कांद्यातील अंतर १०१५ न सेंटीमीटरमध्ये कांदा लागवड केली आहे. दोन पिकातील अंतर योग्य ठेवल्याने उत्पन्नात निश्चित वाढ होते. अशा पद्धतीने लागवड केल्यामुळे एकरी १८ ते २० टन कांदा मिळू शकतो. गेल्या हंगामात पाणी कमी असल्यामुळे १५ ते १६ टन कांदा मिळाला. तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होते.तुषार सिंचनातून देण्यात येणाऱ्या पाण्यातील अंतर कमीत कमी १० दिवस ठेवणे आवश्यक आहे. कांद्याला शेवटचे पाणी लागवडीपासून शंभराव्या दिवशी बंद करावे. त्याचा साठवणुकीवर फार चांगला परिणाम दिसून येतो, असे त्यांनी सांगितले. पाटस परिसरातच नव्हे तर महाराष्ट्रातून अनेक शेतकरी महाराष्ट्रातून त्याचे मार्गदर्शन घेत आहेत.
मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.