
या लेखाविषयी
कार्यक्रमात शेतकरी संदीप घोले यांनी कांदा पिकातील वाढत्या समस्या आणि कांदा बीजातील अशुद्धता यावर शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना कांदा बीजोत्पादन व कांदा पीक परिसंवाद कार्यक्रमामध्ये कांदा बीज उत्पादन करताना घ्यावयाची काळजी, निवड पद्धत, एक डोळा व दोन डोळे कांदे यामधील फरक, बीजोत्पादन करताना करायची बीजप्रक्रिया, कीड व रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन, लागवडीची पद्धत याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.सध्या कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात कांदापातीला पीळ पडून रोपांची मर होत आहे. याबाबत घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
मालकाने दिलेल्या वृत्तपत्र कात्रणाचा सारांश; संपादकीय पडताळणी बाकी आहे.